بِسْمِ ٱللَّهِ ٱلرَّحْمَـٰنِ ٱلرَّحِيمِ
وَيْلٌ لِّكُلِّ هُمَزَةٍ لُّمَزَةٍ ﴿١﴾
104:1 १. मोठी वाईट अवस्था आहे अशा त्या प्रत्येक माणसाची जो व्यंग दोष शोधणारा, चहाडी करणारा असेल.
ٱلَّذِى جَمَعَ مَالًا وَعَدَّدَهُۥ ﴿٢﴾
104:2 २. जो धन - दौलत एकत्र करतो आणि मोजून ठेवतो.
يَحْسَبُ أَنَّ مَالَهُۥٓ أَخْلَدَهُۥ ﴿٣﴾
104:3 ३. तो असे समजतो की त्याची धन - दौलत त्यांच्याजवळ सदा सर्वकाळ राहील.
كَلَّا ۖ لَيُنۢبَذَنَّ فِى ٱلْحُطَمَةِ ﴿٤﴾
104:4 ४. मुळीच नाही. हा तर चुराडा करून टाकणाऱ्या आगीत फेकला जाईल.
وَمَآ أَدْرَىٰكَ مَا ٱلْحُطَمَةُ ﴿٥﴾
104:5 ५. आणि तुम्हाला काय माहीत की अशी आग काय असेल?
نَارُ ٱللَّهِ ٱلْمُوقَدَةُ ﴿٦﴾
104:6 ६. ती अल्लाहने पेटविलेली आग असेल.
ٱلَّتِى تَطَّلِعُ عَلَى ٱلْأَفْـِٔدَةِ ﴿٧﴾
104:7 ७. जी हृदयांवर चढतच जाईल.
إِنَّهَا عَلَيْهِم مُّؤْصَدَةٌ ﴿٨﴾
104:8 ८. (ती आग) सगळीकडून बंदिस्त असेल.
فِى عَمَدٍ مُّمَدَّدَةٍۭ ﴿٩﴾
104:9 ९. आणि त्यांच्यावर मोठमोठ्या खांबांमध्ये.