QuranQuiz bySALSABIL STUDIO
Open the appOpen app

سورة القيامة

Surah Al-Qiyamah in Marathi

40 ayat · Meccan · Surah 75 of 114

🌐 Translation: मराठी

Englishالعربية (بلا ترجمة)اردوBahasa IndonesiaBahasa MelayuTürkçeFrançaisDeutschEspañolPortuguêsItalianoNederlandsРусскийفارسیবাংলাहिन्दीSoomaaliKiswahiliHausaShqipBosanskiAzərbaycancaOʻzbekcha中文日本語한국어ภาษาไทยTiếng ViệtTagalogپښتوPolskiSvenskaNorskSuomiČeštinaRomânăБългарскиУкраїнськаעבריתதமிழ்മലയാളംతెలుగుमराठीગુજરાતીनेपालीසිංහලঅসমীয়াسنڌيدریKurdîދިވެހިئۇيغۇرچەአማርኛAfaan OromooYorùbáKinyarwandaBamanankanChiyaoTamaziɣtMëranawТоҷикӣҚазақшаТатарчаភាសាខ្មែរEnglish (Abdel Haleem)

Translation: Muhammad Shafi’i Ansari

بِسْمِ ٱللَّهِ ٱلرَّحْمَـٰنِ ٱلرَّحِيمِ

لَآ أُقْسِمُ بِيَوْمِ ٱلْقِيَـٰمَةِ ﴿١﴾

75:1 १. मी शपथ घेतो कयामतच्या दिवसाची

وَلَآ أُقْسِمُ بِٱلنَّفْسِ ٱللَّوَّامَةِ ﴿٢﴾

75:2 २. आणि मी शपथ घेतो, धिःक्कार करणाऱ्या मना (आत्म्या) ची.

أَيَحْسَبُ ٱلْإِنسَـٰنُ أَلَّن نَّجْمَعَ عِظَامَهُۥ ﴿٣﴾

75:3 ३. काय मनुष्य असा विचार करतो की आम्ही त्याची हाडे एकत्र करणारच नाहीत?

بَلَىٰ قَـٰدِرِينَ عَلَىٰٓ أَن نُّسَوِّىَ بَنَانَهُۥ ﴿٤﴾

75:4 ४. होय अवश्य करू, आम्हाला सामर्थ्य आहे की त्याच्या बोटांचे एक एक पेर ठीक करावे.

بَلْ يُرِيدُ ٱلْإِنسَـٰنُ لِيَفْجُرَ أَمَامَهُۥ ﴿٥﴾

75:5 ५. परंतु मनुष्य तर इच्छितो की पुढे अवज्ञा आणि अवहेलना करीत राहावे.

يَسْـَٔلُ أَيَّانَ يَوْمُ ٱلْقِيَـٰمَةِ ﴿٦﴾

75:6 ६. विचारतो की कयामतचा दिवस केव्हा येईल.

فَإِذَا بَرِقَ ٱلْبَصَرُ ﴿٧﴾

75:7 ७. तर जेव्हा डोळे जडवत होतील.

وَخَسَفَ ٱلْقَمَرُ ﴿٨﴾

75:8 ८. आणि चंद्र निस्तेज होईल.

وَجُمِعَ ٱلشَّمْسُ وَٱلْقَمَرُ ﴿٩﴾

75:9 ९. आणि सूर्य व चंद्र एकत्र केले जातील.

يَقُولُ ٱلْإِنسَـٰنُ يَوْمَئِذٍ أَيْنَ ٱلْمَفَرُّ ﴿١٠﴾

75:10 १०. त्या दिवशी मनुष्य म्हणेल की आज पळून जाण्यास जागा कोठे आहे?

كَلَّا لَا وَزَرَ ﴿١١﴾

75:11 ११. नाही नाही, आश्रय घेण्याचे कोणतेही ठिकाण नाही.

إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ ٱلْمُسْتَقَرُّ ﴿١٢﴾

75:12 १२. आज तर तुझ्या पालनकर्त्याकडेच (आश्रयाचे) ठिकाण आहे.

يُنَبَّؤُا۟ ٱلْإِنسَـٰنُ يَوْمَئِذٍۭ بِمَا قَدَّمَ وَأَخَّرَ ﴿١٣﴾

75:13 १३. आज माणसाला, त्याने जे काही पुढे पाठविले आणि जे काही मागे सोडले, त्याविषयी अवगत करून दिले जाईल.

بَلِ ٱلْإِنسَـٰنُ عَلَىٰ نَفْسِهِۦ بَصِيرَةٌ ﴿١٤﴾

75:14 १४. किंबहुना मनुष्य स्वतःच स्वतःवर प्रमाण आहे.

وَلَوْ أَلْقَىٰ مَعَاذِيرَهُۥ ﴿١٥﴾

75:15 १५. मग तो कितीही सबबी सादर करीत असला तरी.

لَا تُحَرِّكْ بِهِۦ لِسَانَكَ لِتَعْجَلَ بِهِۦٓ ﴿١٦﴾

75:16 १६. (हे पैगंबर!) तुम्ही कुरआनास त्वरित तोंडी पाठ करण्यासाठी आपल्या जीभेला (घाईने) हलवू नका.

إِنَّ عَلَيْنَا جَمْعَهُۥ وَقُرْءَانَهُۥ ﴿١٧﴾

75:17 १७. त्यास एकत्र करणे आणि (तुमच्या तोंडून) पठण करविणे आमची जबाबदारी आहे.

فَإِذَا قَرَأْنَـٰهُ فَٱتَّبِعْ قُرْءَانَهُۥ ﴿١٨﴾

75:18 १८. (यास्तव) आम्ही जेव्हा त्याचे पठण संपवू तेव्हा तुम्ही त्याच्या पठणाचे अनुसरण करा.

ثُمَّ إِنَّ عَلَيْنَا بَيَانَهُۥ ﴿١٩﴾

75:19 १९. त्यास स्पष्ट करणे आमचे काम आहे.

كَلَّا بَلْ تُحِبُّونَ ٱلْعَاجِلَةَ ﴿٢٠﴾

75:20 २०. नव्हे, तुम्ही तर लवकर प्राप्त होणाऱ्या (जगा) शी प्रेम राखता.

وَتَذَرُونَ ٱلْـَٔاخِرَةَ ﴿٢١﴾

75:21 २१. आणि आखिरतला सोडून बसला आहात.

وُجُوهٌ يَوْمَئِذٍ نَّاضِرَةٌ ﴿٢٢﴾

75:22 २२. त्या दिवशी अनेक चेहरे ताजे टवटवीत (व तेजस्वी) असतील.

إِلَىٰ رَبِّهَا نَاظِرَةٌ ﴿٢٣﴾

75:23 २३. आपल्या पालनकर्त्याकडे पाहत असतील

وَوُجُوهٌ يَوْمَئِذٍۭ بَاسِرَةٌ ﴿٢٤﴾

75:24 २४. आणि कित्येक चेहरे त्या दिवशी (कुरुप आणि) उदास असतील

تَظُنُّ أَن يُفْعَلَ بِهَا فَاقِرَةٌ ﴿٢٥﴾

75:25 २५. समजत असतील की त्यांच्याशी कंबर तोडणारा व्यवहार केला जाईल.

كَلَّآ إِذَا بَلَغَتِ ٱلتَّرَاقِىَ ﴿٢٦﴾

75:26 २६. नाही नाही जेव्हा (प्राण) कंठाशी पोहचतील

وَقِيلَ مَنْ ۜ رَاقٍ ﴿٢٧﴾

75:27 २७. आणि सांगितले जाईल की कोणी झाड फुंक (तंत्र मंत्र) करणारा आहे?

وَظَنَّ أَنَّهُ ٱلْفِرَاقُ ﴿٢٨﴾

75:28 २८. आणि त्याने खात्री केली की ही वियोगाची वेळ आहे.

وَٱلْتَفَّتِ ٱلسَّاقُ بِٱلسَّاقِ ﴿٢٩﴾

75:29 २९. आणि पोटरीशी पोटरी बिलगेल.

إِلَىٰ رَبِّكَ يَوْمَئِذٍ ٱلْمَسَاقُ ﴿٣٠﴾

75:30 ३०. आज तुझ्या पालनकर्त्याकडे जायचे आहे.

فَلَا صَدَّقَ وَلَا صَلَّىٰ ﴿٣١﴾

75:31 ३१. तेव्हा त्याने ना तर समर्थन केले, ना नमाज अदा केली.

وَلَـٰكِن كَذَّبَ وَتَوَلَّىٰ ﴿٣٢﴾

75:32 ३२. उलट खोटे ठरविले आणि विमुख झाला

ثُمَّ ذَهَبَ إِلَىٰٓ أَهْلِهِۦ يَتَمَطَّىٰٓ ﴿٣٣﴾

75:33 ३३. मग आपल्या कुटुंबियांकडे तोऱ्यात गेला

أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰ ﴿٣٤﴾

75:34 ३४. खेद आहे तुझ्याबद्दल! पश्चात्ताप आहे तुझ्यावर!

ثُمَّ أَوْلَىٰ لَكَ فَأَوْلَىٰٓ ﴿٣٥﴾

75:35 ३५. पुन्हा दुःख आहे आणि दुर्दशा आहे तुझ्यासाठी!

أَيَحْسَبُ ٱلْإِنسَـٰنُ أَن يُتْرَكَ سُدًى ﴿٣٦﴾

75:36 ३६. काय मनुष्य असे समजतो की त्याला व्यर्थ असे सोडून दिले जाईल

أَلَمْ يَكُ نُطْفَةً مِّن مَّنِىٍّ يُمْنَىٰ ﴿٣٧﴾

75:37 ३७. काय तो एक गाढ पाण्याचा थेंब नव्हता, जो टपकविला जातो?

ثُمَّ كَانَ عَلَقَةً فَخَلَقَ فَسَوَّىٰ ﴿٣٨﴾

75:38 ३८. मग तो रक्ताचा गोळा बनला, मग (अल्लाहने) त्याला निर्माण केले आणि योग्यरित्या बनविले.

فَجَعَلَ مِنْهُ ٱلزَّوْجَيْنِ ٱلذَّكَرَ وَٱلْأُنثَىٰٓ ﴿٣٩﴾

75:39 ३९. मग त्यापासून जोडी अर्थात नर-मादा बनविले

أَلَيْسَ ذَٰلِكَ بِقَـٰدِرٍ عَلَىٰٓ أَن يُحْـِۧىَ ٱلْمَوْتَىٰ ﴿٤٠﴾

75:40 ४०. काय (अल्लाह) या गोष्टी समर्थ नाही की मेलेल्यास जिवंत करावं?

Do you really know Surah Al-Qiyamah by heart?

A short test shows exactly where you slip. No sign-up, free.

Start the test

Hear Surah Al-Qiyamah from all 90 reciters →